situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 04 october 2025 : गुंतवणुकीच्‍या नावाखाली ४८ लाखांची फसवणूक

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 4 OCtober 2025
---Advertisement---

Team My Pune City – ट्रस्‍टलाइन सिक्‍युरिटीज्‌ या ( Pimpri Chinchwad Crime News 04 october 2025) नावाखाली ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवून ४८ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३० जुलै ते १० सप्‍टेंबर या कालावधीत पिंपळे सौदागर परिसरात घडली आहे.

लक्ष्मी प्रिया पांडा (ट्रस्‍टलाइन सिक्‍युरिटीज्‌ कंपनीची कर्मचारी), ट्रस्‍टलाइन सिक्‍युरिटीज्‌ सर्कल ग्रुप अॅडमिन व इतर लाभार्थी खातेधारक (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. याबाबत लोटस हॉस्पिटलजवळ, पिंपळे सौदागर येथील ५२ वर्षीय व्‍यक्‍तीने शुक्रवारी (दि. ३) सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीने व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क करून ट्रस्‍टलाइन सिक्‍युरिटीज्‌ सर्कल या ग्रुपमध्ये सामील केले. स्टॉक मार्केट गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादीकडून ४८ लाख ३६ हजार रुपये विविध खात्यांमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली घेतले. नफा दाखवून पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता रक्कम मिळाली नाही आणि आरोपींनी संपर्क तोडला. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

PMC : ‘जागर अभिजात मराठीचा’ : पुणे महानगरपालिकेच्या उपक्रमाने बालगंधर्व रंगमंदिरात मराठी संस्कृतीचा जल्लोष

कोयता बाळगणारा तरुण अटकेत ( Pimpri Chinchwad Crime News 04 october 2025)

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या प्रतिबंधक आदेशाचा भंग करून अवैधरित्या कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला भोसरी पोलीसांनी अटक केली आहे.शुक्रवारी मध्‍यरात्री पावणे एक वाजताच्‍या सुमारास अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ ही कारवाई करण्‍यात आली.

रोहन विश्वासराव मारोडे (वय ३० वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, फुलनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार प्रविण बबनराव जाधव (वय ३४) यांनी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पालिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पावणे एक वाजता अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ रोडच्या कडेला आरोपी कोयता बाळगताना आढळला. या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Nilesh Badhale : बधालेवस्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निलेश बधाले

अल्‍पवयीन मुलाला दांडियाने मारहाण

किरकोळ वादातून एका १५ वर्षीय मुलाला स्टीलच्या दांडियाने मारहाण करून जखमी केले. ही घटना चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी परिसरात गुरुवारी (दि. २) रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास घडली.

आनंद उर्फ अॅडी गायकवाड (रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. गोपाल अंजप्पा ब्‍यागर (वय १५, रा. साईबाबा नगर झोपडपट्टी, चिंचवड स्‍टेशन) असे जखमी झालेल्‍या अल्‍पवयीन मुलाचे नाव असून त्‍याने शुक्रवारी (दि. ३) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी व त्याचा मित्र आनंदनगर येथील आजादी युवा ग्रुपच्या समोरून जात असताना आरोपीसमवेत किरकोळ धक्का लागल्याच्या रागातून भांडण झाले. यावेळी चिडलेल्‍या आरोपीने स्‍टीलच्‍या दांडियाने अल्‍पवयीन मुलाच्या डोक्यावर मारहाण केली. यात तो जखमी झाला असून रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रकच्या धडकेत महिला जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 04 october 2025)

भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास रावेत येथील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर घडली.

विलास निवृत्ती बोचरे (रा. तुळशी, बोचरे वस्ती, ता. माढा, जि. सोलापूर) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. अनिल गोविंद औदणकर (वय ५९ वर्षे, रा. मानुर्वी, देहूरोड, जि. पुणे) असे किरकोळ जखमी झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. ३) याबाबत रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. तर सुनिता नारायण धोत्रे (वय ४०, रा. साईनगर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) असे गंभीर जखमी झालेल्‍या दुचाकीस्‍वार महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी व सुनिता धोत्रे हे दोघेजण मोटारसायकलने जात होते. त्‍यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनिता या गंभीर जखमी झाल्‍या असून त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रावेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गुंतवणुकीच्‍या नावाखाली २.१० कोटींची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 04 october 2025)

ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी तब्बल दोन कोटी १० लाख ४ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ९ जुलै ते ९ सप्‍टेंबर दरम्‍यान ऑनलाइन पद्धतीने घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात बँक खातेधारक व ग्रुप ॲडमीन (नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी “India Stock Circle” या टेलिग्राम ग्रुपमार्फत फिर्यादीचा संपर्क साधून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला नफा दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर कर, फी व चार्जेसच्या नावाखाली विविध वेळा दोन कोटी १० लाख रुपये हस्तांतरित करून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण नाळे अधिक तपास करीत आहेत.

धक्‍का लागल्‍याने रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला ( Pimpri Chinchwad Crime News 04 october 2025)

दुचाकीला रिक्षाचा किरकोळ धक्का लागल्‍याच्‍या कारणावरून रिक्षाचालकावर कोयता व दांडक्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना चाकण येथील नाणेकरवाडी गावातील दांडिया कार्यक्रमादरम्यान गुरुवारी (दि. २) रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास घडली.

ओम चालू नाणेकर व रजत येरकर (दोघेही रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) आणि त्‍यांचे दोन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. श्रीकांत तुकाराम शिंदे (वय २९, रा. गोकुळ सोसायटी, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्‍या सुमारास तुकाराम शिंदे आणि त्याचा मित्र अविनाश हे श्रीराम नवरात्र मित्र मंडळाच्या कार्यक्रमात उपस्थित असताना आरोपी मोटारसायकलवर ट्रीपलसीट बसून आले. रिक्षाला धक्का लागल्यावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी कोयता व दांडक्याने शिंदे व त्याच्या मित्रावर हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Follow Us On