Team My Pune City – प्रियकराच्या सततच्या मारहाणीला (Pimpri Chinchwad)कंटाळून प्रियसीने तिच्या भावाच्या मदतीने प्रियकराचा खून केला आहे. या घटनेची उकल पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीन च्या पोलिसांनी 48 तासात करत सर्व आरोपींना अटक केली आहे. मुकेश कुमार (वय 24 ) याचा गुरुवारी (दि.2) आरोपींनी खून केला होता.
त्याचा मृतदेह आरोपींनी ब्लँकेट मध्ये गुंडाळून चाकण जवळील कडाचीवाडी येथील ठाकर वस्ती जवळ फेकून दिला होता. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास करत संभाजीनगर येथून आकाश बिजलाउराम उराव (वय 21) आरती कुमारी बिजला उराम उराव (वय 23), बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (वय 21) या आरोपींना अटक केली.
Talegaon Dabhade-कायद्याचे शिक्षण हे समाजाच्या न्यायव्यवस्थेचा पाया -प्रा. डॉ. सुरेश गोसावी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आरती कुमारी व मयत मुकेश यांची मागील तीन वर्षापासून प्रेम संबंध होते. ते दोघे एकत्रितच राहत होते. मात्र मुकेश हा तिला सतत छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करायचा. यातून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्याच्या या मारहाणीला कंटाळूनच आरतीने तिचा भाऊ व आणखी एक साथीदाराच्या मदतीने हत्याराने तोंडावर डोक्यावर वार करत मुकेशचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्य उद्देशाने मृतदेह निर्जन स्थळे फेकून दिला.
मात्र पोलिसांनी कौशल्य पूर्ण तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज तसेच काही व्यक्ती ह्या अचानक खोली सोडून गेल्याच्या संशयातून पोलिसांनी आरोपीचा माग घेतला. आरोपी संभाजीनगर येथे लपून बसल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी संभाजीनगर येथे जात आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलिस अंमलदार राजाराम लोणकर, योगेश आढारी, राम मेरगळ, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, समीर काळे, शेखर खराडे यांनी केली आहे.