Team My Pune City – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ( Pune Diwali firecracker rules) फटाके विक्री आणि वाजवण्यासंबंधी कठोर नियम जाहीर केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
वेळेची मर्यादा ( Pune Diwali firecracker rules)
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणतेही ध्वनी निर्माण करणारे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
शांतता प्रभाग
रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही वेळेत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Talegaon School Attack : शाळकरी मुलांच्या भांडणात धारदार शस्त्राने वार
विशेष फटाके बंदी ( Pune Diwali firecracker rules)
‘अॅटमबॉम्ब’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्फोटक फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा साठा ठेवणे पूर्णपणे निषिद्ध आहे.
विक्रेत्यांसाठी नियम ( Pune Diwali firecracker rules)
- पुणे शहरात फटाके विक्री परवाने फक्त २० ते २४ ऑक्टोबर या कालावधीतच वैध राहतील.
- विक्रीदरम्यान फटाक्यांचा आवाज चार मीटर अंतरावर १२५ डेसीबलपेक्षा जास्त नसावा, याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
ठिकाणाची मर्यादा
रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत, तसेच महामार्ग किंवा पुलांवर फटाके फोडणे, फेकणे किंवा अग्निबाण उडवणे मनाई करण्यात आले ( Pune Diwali firecracker rules) आहे.
Pune:भाजपच्या वतीने कोंढव्यात आयुष्यमान भारत कार्डचे वाटप
पोलिसांचा इशारा
“नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता न दाखवता कठोर कारवाई केली जाईल,” असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले ( Pune Diwali firecracker rules) आहे.