Team My Pune City – ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या संकल्पनेतून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML Library)(पीएमपीएमएल) तर्फे तयार करण्यात आलेल्या स्क्रॅप बसमधील “मोफत वाचनालय” या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ आज बुधवार (दि. ८ ऑक्टोबर २०२५) रोजी फर्ग्युसन कॉलेज परिसरात आमदार मा. सिद्धार्थ शिरोळे व पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. पंकज देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य . शाम मुडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, अॅड्रानेट कंपनीचे प्रतिनिधी . किरण रहाणे,. राजेश साळवे, कामगार व जनता संपर्क अधिकारी . किशोर चौहान, वाहतूक नियोजन अधिकारी नारायण करडे तसेच इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
Pune: दिवाळी निमित्त एसटी च्या पुण्यातून ५८९ जादा बस सोडणार – १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान विशेष सेवा
Vadgaon Maval:वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर : महिलांचेच वर्चस्व
या वाचनालय उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व वाचन संस्कृतीला चालना देणे हा आहे. या वाचनालयात विविध विषयांवरील शैक्षणिक, धार्मिक, प्रेरणादायी, ऐतिहासिक आणि सर्वसामान्य ज्ञानविषयक पुस्तके मोफत वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी वाचनालयासाठी तब्बल २५० पुस्तके भेट दिली. ‘वाचाल तर वाचाल’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाचनालय बसमध्ये मोफत वाय-फाय सुविधा अॅड्रानेट कंपनीचे किरण रहाणे यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, वाचनप्रेमींसाठी आणखी सुविधा म्हणून या वाचनालय बसमध्ये मोफत वाय-फाय सेवा पुरविण्यात येणार आहे.